Dairy Industry : डेअरी उद्योगाच्या राजधानीवर 'अमूल'चा दबदबा

Team Agrowon

डेअरी उद्योगाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुबंईच्या बाजारपेठेवर अमूलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Dairy Industry | Agrowon

महानंद कुचकामी ठरल्याने परराज्यातील डेअरींनी स्थानिक बाजारपेठ ताब्यात घेतल्याचे डेअरी उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Dairy Industry | Agrowon

आर्थिक राजधानी शिवाय डेअरी उद्योगाचे प्रमुख केंद्र अशी मुंबईची ओळख समजली जाते.

Dairy Industry | Agrowon

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून रोज दीड कोटी लिटरपेक्षा जास्त दूधाचे उत्पादन केले जाते.

Dairy Industry | Agrowon

यापैकी मुंबईच्या बाजारपेठेकडून अंदाजे ५५ लाख लिटर दुधाची खरेदी केली जाते.

Dairy Industry | Agrowon

महानंदच्या व्यवस्थापनातील सततच्या गैरव्यवहार आणि राजकारणामुळे आता अवघी ८० हजार लिटरची बाजारपेठ महानंदकडे उरली आहे.

Dairy Industry | Agrowon

या उलट अमूलकडे ३० टक्क्यांच्या आसपास हिस्सा असून सध्या अमूलकडून मुंबईच्या बाजारात दररोज १६ लाख लिटर दूध विकले जाते आहे.

Dairy Industry | Agrowon