Statue Photo : आधुनिकतेच्या युगात शिल्पकलेचा वारसा जपणारा कोकणातील एक कलाकार!

Team Agrowon

गेले बरेच दिवस मित्राला भेटवस्तू म्हणून स्वामींची मूर्ती देण्यासाठी शोध घेत होतो. पण भावेल अशी मूर्ती सापडतच न्हवती.

Photography | A B Mane

शोध मोहीम राबवत असताना सोशल मीडियावरती गर्दी मध्ये एक आगळं वेगळं काम दिसून आल. पाहता क्षणी भावेल असे कोरीव आणि सुबक काम!

Photography | A B Mane

अनंत चौगुले हा सावंतवाडी जवळील माजगाव गावामध्ये राहून मूर्ती घडवायचे काम करतो आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचे अधिकृत शिक्षण न घेता त्याचा वडिलांकडून हळू हळू शिकत त्याने हा कलेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे.

Photography | A B Mane

माजगाव सारख्या छोट्या गावात राहून तो त्याची कला जगभरात पोहोचवत आहे आणि सोशल मीडिया वरती सुद्धा त्याने चांगलाच प्रसिध्दी कमवली आहे.

Photography | A B Mane

मूर्तीसाठी झालेला संपर्क गप्पा मारता मारता भेटण्याकडे वळला आणि खास त्याला भेटण्यासाठी मी एक सिंधुदुर्ग भागात ट्रीप चे नियोजन केले.

Photography | A B Mane

भेटल्यावर त्याची कला आणि माणूस म्हणून तो दोन्ही गोष्टी फार आवडल्या आणि म्हणूनच त्याचा बद्दल चार शब्द लिहावे असे वाटले.

Photography | A B Mane

यामधून कळत नकळत माझ्या मित्रपरिवारामधून त्याला काही मदत झाली

Photography | A B Mane

तर तेवढंच पुण्य प्राप्ती म्हणण्यास हरकत नाही!!

Photography | A B Mane
cta image | Agrowon