Bajra News : बाजरीचे दर तेजीत

Anil Jadhao 

सध्या बाजारातील बाजरीची आवकही कमी आहे. त्यामुळे बाजरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या बाजरीला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

देशात यंदा बाजरी लागवड ७ टक्क्यांनी वाढून ७० लाख हेक्टरवर पोचली होती. यापैकी जवळपास ६५ टक्के लागवड एकट्या राजस्थानमध्ये झाली. यंदा राजस्थानमध्ये ४५ लाख हेक्टरवर बाजरी पीक होते.

उत्तर प्रदेशात यंदा लागवड वाढून १० लाख हेक्टरवर पोचली होती. तर गुजरातमध्ये साडेचार लाख हेक्टर आणि महाराष्ट्रात ४ लाक हेक्टरवर बाजरीचा पेरा झाला.

यंदा बाजरीचा  पेरा वाढला खरा, मात्र उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरुवातीच्या काळात बाजरी पेरणीस पुरक पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणीला उशीर झाला. तर गुजरात आणि महाराष्ट्रात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने पिकाचे नुकसान केले.

मागील हंगामात देशातील बाजरी उत्पादन जवळपास १ लाख टनाने घटले होते. मागील हंगामात देशात ६३ लाख हेक्टरवर बाजरीचे पीक होते. त्यामुळे उत्पादन ९ लाख ६७ हजार टनांवर स्थिरावले होते.

केंद्र सरकारने पहिल्या अंदाजात यंदा ९ लाख ७५ हजार टन बाजरी उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मते बाजरीचे उत्पादन सरकारच्या अंदाजपेक्षा कमीच राहील.

cta image