Bamboo Craft : बांबूमुळे झाली ग्रामीण भागातील शाश्वत रोजगाराची निर्मिती

Team Agrowon

"कडवी क्राफ्ट" हा (ता. शाहूवाडी, जि.कोल्हापूर) नव्या पिढीच्या उपक्रमशील मुला-मुलींचा कलाकारीतून उदयास आला.

Bamboo Craft | Amit gadre

पर्यटक परत जाताना आंब्याची आठवण म्हणून काहीतरी घेऊन गेला पाहिजे. यातून पुढे आली बांबू क्राफ्ट संकल्पना

Bamboo Craft | Amit gadre

बांबू शाहूवाडी शिवारातील प्रमुख पीक, त्याचाच वापर करून पहिल्या टप्प्यात बांबू पेन स्टँड आणि शिडाची होडी निर्मिती पक्की झाली.

Bamboo Craft | Amit gadre

शाहूवाडी येथे बांबू क्राफ्ट संबंधी प्रशिक्षण पूर्ण केले आणि पेन स्टँड आणि शिडाची होडी निर्मितीचे पक्के ठरले.

Bamboo Craft | Amit gadre

आंबा परिसरातील महिला गोधडी शिवण्यात माहीर, विशेष म्हणजे ही हात शिलाईची गोधडी. इतर भागांपेक्षा डिझाईन पॅटर्न वेगळाच आहे.

Godhadi | Amit gadre

आंबा गावातील शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्थेच्या माध्यमातून लुप्त होत चाललेल्या कोकण कपिला या देशी गोवंशाचे संवर्धन होत आहे.

Deshi Product | Amit gadre

देशी गाईचे औषधी तूप, सुगंधी धूप, गोवरी, गांडूळ खत, व्हर्मीवॉश, गोखुर खत, गोमूत्र अर्क, मसाज तेल, केश तेल, साबण अशी उत्पादने तयार करण्यात आली आहेत.

Deshi Product | Amit gadre

ग्रामीण भागात शाश्वत रोजगार उभा राहिला तरच भारत देश आणखी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल, सुजलाम, सुफलाम होईल.

Bamboo Craft | Amit gadre