Banana Market : केळी उत्पादकांना 'कुकुंबर मोझॅक व्हायरस'चा फटका

Team Agrowon

खानदेशसह मध्य प्रदेशात जुलै व ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळी बागांवर (Banana Orchard) कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) (Kukumber Mosaic disease) या विषाणूजन्य रोगाचा (Viral Disease) फैलाव झाला आहे.

केळीचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील शहादा भागांतही हा रोग केळी पिकात दिसून आला आहे. सीएमव्हीने पीक वाया गेल्याने ते काढून फेकण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

जिल्ह्यातील रावेरमधील केऱ्हाळे, दसनूर, अहिरवाडी, वाघोदा बुद्रुक, मुक्ताईनगरमधील नायगाव, अंतुर्ली परिसर, जामनेरातील हिंगणे, पळासखेडा भाग, यावलमधील बामणोद, भालोद, न्हावी, कोचूर परिसर, नंदुरबारच्या शहादामधील ब्राह्मणपुरी, जवखेडा परिसरात सीएमव्ही रोगाचा फैलाव केळी पिकात झाला आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील दापोरी, दापुरा, फोकनार, नाचणखेडा, दर्यापूर, शिरपूर, गुलई आदी भागातही जुलै व ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळी बागांत सीएमव्ही दिसून आला आहे.

‘सीएमव्ही’मुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टर केळीखालील क्षेत्र बाधित झाले आहे. यात काही बागांत या रोगाची लागण सुरुवातीच्या स्थितीत आहे.

परंतु दोन ते अडीच हजार हेक्टरवरील बागा १०० टक्के काढून फेकण्याची स्थिती आहे. केऱ्हाळे (ता. रावेर) येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या १० हजार केळी झाडे थेट काढून फेकली आहेत.

केळी लागवडीसाठी सुरुवातीलाच एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. तसेच जमिनीतून तसेच विद्राव्य खतेही दिली जातात. यावर आणखी वेगळा खर्च असतो.klik