Beekeeping Business : महाराष्ट्रात मधमाशी पालन व्यवसायात मोठी संधी

Team Agrowon

मधमाशीपालन व्यवसायात मोठी संधी

मधमाशीचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास या व्यवसायातही मोठी संधी आहे. महाराष्ट्रातही मधाला मोठी मागणी आहे.

Beekeeping Business | Agrowon

मधमाशीपालनासाठी उपयुक्त पिक

महाराष्ट्रात तीनही हंगामात येणाऱ्या आणि मधमाशीपालनासाठी उपयुक्त असलेल्या सूर्यफूल, बाजरी, मका, तूर, शेवगा आणि आवळा या सहा पिकांवर लक्ष केंद्रित केल्यास त्याचे फलदायी परिणाम समोर येणार आहेत.

Beekeeping Business | Agrowon

या सहा पिकांवर कीटकनाशकांच्या जास्त फवारण्या होत नाहीत, ही बाब मधमाशांसाठी पूरकच ठरते.

Beekeeping Business | Agrowon

पिक नियोजन व मधमाशी पालन

प्रत्येक विभागात घेतल्या जाणाऱ्या प्रचलित पिकांसोबतच या पिकांचे योग्य नियोजन करून लागवड केली तर मधमाशी पालन यशस्वी होईल.

Beekeeping Business | Agrowon

परागीभवनाचा फायदा

मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे इतर पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.

Beekeeping Business | Agrowon

स्प्रेड हनी

सूर्यफुलापासून तयार होणाऱ्या मधाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे कारण या मधाचे लवकर स्फटिकीभवन होते. अशा मधाला पाश्चिमात्य देशांत ‘स्प्रेड हनी’ म्हणून मोठी मागणी असते. 

Beekeeping Business | Agrowon

दैनंदिन आहारात मधाचा वापर

मधाचा वापर फक्त औषधापुरताच न राहता दैनंदिन आहारातही त्याचा वापर वाढत आहे. मागील वर्षी भारतातील मधाचे एकूण उत्पादन साधारण सव्वा लाख मेट्रिक टन होते.

Beekeeping Business | Agrowon

मधमाशी पालन प्रशिक्षण

गावागावात तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत योग्य प्रशिक्षण घेऊन वरील सहा पिकांची लागवड केली आणि मधमाशी पालन सुरू केले तर ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो.

Beekeeping Business | Agrowon
Ethanol Production | Agrowon