Karli Bajar : कारल्याचे दर बाजारात टिकून

Anil Jadhao 

देशातील बाजारात कारल्याला सध्या चांगला दर मिळतोय.

कारल्याला मागणी वाढल्याचं विक्रेते सांगत आहेत. मागील महिनाभराच्या तुलनेत सध्या कारल्याचे दर वाढलेले आहेत.

मागणीच्या तुलनेत बाजारातील आवक काहीशी मर्यादीत असल्याचंही सांगितलं जातं.

सध्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्या वगळल्या तर सरासरी आवक ही १० ते २० क्विंटलच्या दरम्यान होते.

सध्या कारल्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

कारल्याचे दर टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

cta image