Bullock Cart Race : बैलगाडी शर्यतीचं आयोजन करायचंय ? मग हे नियम वाचाच...

Team Agrowon

शर्यतीचा थरार

बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे गावोगावी बैलगाडा शर्यतींचा थरार सुरू झाला आहे.

Bullock Cart Race | agrowon

नियमांचं बंधन

शर्यत आयोजन करताना मात्र, कोर्टाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे लागणार आहे.

Bullock Cart Race | agrowon

सरकारकडून मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाने १६ पानांचे परिपत्रक काढले आहेत.

Bullock Cart Race | agrowon

सण-उत्सवाचे निमित्त

यामध्ये ग्रामीण संस्कृती आणि परंपरेनुसारचे धार्मिक सण उत्सव, यात्रा, यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आलेली आहे.

Bullock Cart Race | agrowon

वाढदिवसास मनाई

राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे वाढदिवसनिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Bullock Cart Race | agrowon

1000 मीटर पेक्षा जास्त अंतर

बैल-घोडा, लाकूड ओंडका ओढणे, चिखलगुट्टा, समुद्रकिनाऱ्यावरील शर्यती, टक्कर तसेच 1000 मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.

Bullock Cart Race | agrowon

जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज

शर्यतीच्या आयोजकांनी किमान १५ दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार. त्यासोबत रु. ५० हजार रुपये मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात ठेवावी लागणार आहे

Bullock Cart Race | agrowon

एका दिवसात ३ पेक्षा

कोणत्याही बैलांचा वापर एका दिवसामध्ये 3 पेक्षा अधिक शर्यतीसाठी करण्यात येवू नये.

Bullock Cart Race | agrowon
eknath-shinde | agrowon