Gold Market : ग्रामीण भागात सोने खरेदी रोडावणार

Team Agrowon

सध्या देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत सोन्याची खरेदी मंदावण्याची शक्यता आहे.

Gold Market | Agrowon

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील सोने खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत एक चतुर्थांश कमी होण्याची शक्यता आहे.

Gold Market | Agrowon

Gold Marketवर्ल्ड गोल्ड कौन्सिलने ही माहिती दिली आहे. भारत सोने खरेदीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सध्या सोन्याचे व्यवहार मागच्या दोन वर्षातील नीचांकी पातळीच्या जवळ गेले आहेत.

Gold Market | Agrowon

पण सोन्याची आयात घटल्याने भारताची व्यापारी तूट कमी होऊन रुपयाला आधार मिळू शकतो. कोरोना, लॉकडाऊनमुळे कोलमडलेला सोन्याचा धंदा कसाबसा सावरत मागच्या वर्षात रुळावर येत होता.

Gold Market | Agrowon

मात्र सध्याच्या महागाईमुळे ग्रामीण भागात सोन्याच्या खरेदीत पुन्हा घट होऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Gold Market | Agrowon

भारतातील सोन्याच्या मागणीपैकी ७५ टक्के मागणी ग्रामीण भागातून असते. ग्रामीण भागात गुंतवणुकीसाठी सोन्याला सगळ्यात जास्त पसंती दिली जाते.

Gold Market | Agrowon
cta image | Agrowon