Drone Technology : ड्रोन तंत्रज्ञानाच्या अंगिकाराचा आग्रह

Devendra Shirurkar

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ड्रोन (Drone) उपलब्ध व्हावेत यासाठी राज्यांसमवेत काम करण्याचा सल्ला केंद्र सरकारने कृषी रसायन उद्योग क्षेत्राला दिला.

Kisan Drone | Agrowon

शेतीमधील विविध फवारण्यांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone Technology) वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडूनही त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात थिंकॲग (ThinkAg) आणि क्रॉप लाईफ इंडिया (CropLife India) यांच्यातर्फे 'ॲगलॅब - कनेक्टिंग इंनोव्हेटर्स' हा परिसंवाद आयोजित करण्यात आला.

Kisan Drone | Agrowon

ड्रोन तंत्रज्ञानावर आयोजित परिसंवादात कृषी रसायन क्षेत्राने काही सूचना केल्या. तर कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी काय करायला हवे, याबाबत सरकारकडून काही सूचना देण्यात आल्या.

Kisan Drone | Agrowon

आता शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रमाणात ड्रोन (Drone) उपलब्ध होतील, याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कृषी क्षेत्रातील ड्रोन उत्पादन आणि सेवेसाठी सध्या २०० हून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. हे स्टार्टअप्स यात निर्णायक भूमिका बजावू शकतील, असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहसचिव शोमिता बिस्वास (Shomita Biswas) यांनी व्यक्त केला.

Kisan Drone | Agrowon

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ड्रोन उपलब्ध व्हावेत यासाठी राज्यांसमवेत काम करण्याचा सल्ला केंद्र सरकारने कृषी रसायन उद्योग क्षेत्राला दिला.

Kisan Drone | Agrowon

देशातील विविध राज्यांसोबत समन्वय साधने आणि स्वतःची कस्टम हायरिंग सेंटर (CHC) सुरु हा करणे हा या स्टार्टअप्ससाठी पुढचा टप्पा असेल, असे बिस्वास यांनी सांगितले. कुठलाही बी.एससी पदवीधारक अथवा कृषी पदवीधारक स्वतःचे कस्टम हायरिंग सेंटर सुरु करू शकणार आहे. त्याला केंद्र सरकारच्या अनुदानाच्या मदतीने स्वतःचे ड्रोन खरेदी करता येणार आहे.

Kisan Drone | Agrowon

कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारकडून जे अभियान राबवले जात आहे त्यात ग्रामीण भागातील युवकांना सहभागी करून घेण्यात येत असल्याचे बिस्वास यांनी सांगितले.

Kisan Drone | Agrowon

स्वतःचे ड्रोन शेतकऱ्यांना फवारणीसाठी भाडेतत्वावर देऊन त्याला व्यवसाय करता येणार आहे. या माध्यमातून त्याला स्वतःला रोजगार मिळणार आहे अथवा उद्योजक होऊन त्याला इतरांना रोजगार देता येणे शक्य होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kisan Drone | Agrowon