हरभरा बाजाराला नाफेडच्या खरेदीचा आधार

Anil Jadhao 

देशात यंदा ८१ लाख ४३ हजार हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती. पाऊस चांगाल झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत दीड टक्क्याने पेरा वाढला होता.

Agrowon

वाढलेली पेरणी आणि पोषक वातावरणामुळे देशात यंदा १३१ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला.

Agrowon

मात्र व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाच्या मते सरकारचा अंदाज खरा ठरणार नाही. यंदा देशात ८५ ते ९० लाख टनच हरभरा उत्पादन होईल.

Agrowon

सध्या बाजारात हरभरा आवक वाढली आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील बाजरात हरभरा आवक वाढली.

Agrowon

आवकेच्या दबावामुळे हरभरा दर सध्या दबावात आहेत. सरकारने यंदा हरभऱ्याला ५२३० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहिर केला. मात्र बाजारात सध्या ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

Agrowon

खुल्या बाजारात दर कमी असल्याने शेतकरी नाफेडला विक्री करत आहेत. नाफेडने आतापर्यंत देशभरात ७ लाख २३ हजार टन हरभऱ्याची खरेदी केली.

Agrowon

सध्या खुल्या बाजारात दर कमी असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon