Chana Market: हरभरा दर वाढण्याचा अंदाज

Anil Jadhao 

हरभऱ्याचे भाव मागील रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यापासून दबावात आहे. मात्र आता हरभरा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं जाणकार सांगतात.

चालू रब्बी हंगामात हरभरा पेरा कमी होण्याचा अंदाज आहे. तर सध्या देशात चांगल्या दर्जाच्या हरभऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याचं व्यापारी सांगतात.

तसंच खरिपातील तूर, मूग आणि उडीद या कडधान्याचं उत्पादन कमी झालंय. तुरीचे दरही तेजीत आहेत. त्यामुळं तुरीची काही मागणी हरभऱ्याकडं वळू शकते. या सर्व घटकांमुळे स्टाॅकिस्ट बाजारात संधी शोधत आहेत.

सध्या हरभऱ्याला ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. त्यामुळे स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांना जोखीम कमी आहे.

देशातील एकूण हरभरा वापरापैकी तब्बल ५० टक्के वापर हा हाॅटेल, रेस्टाॅरेंट्स आणि प्रक्रिया उद्योगात होतो. या सर्व क्षेत्रातून मागणी चांगली आहे. मात्र नाफेडकडेही हरभऱ्याचा चांगला स्टाॅक आहे. त्यामुळं हरभऱ्यातील तेजी मर्यादीत राहील.

देशातील उत्पादन कमी झालं तरी बाजार नाफेडकडील स्टाॅककडे नजर ठेऊन चालेल. पण सध्या शेतकऱ्यांकडे हरभरा असण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र या स्थितीचा फायदा नव्या हरभरा विक्री करताना होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image