Chana Procurement : अखेर हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढविले

Team Agrowon

हरभरा हमीभाव

उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे राज्यातील काही भागांतील हमीभावाने हरभरा खरेदी बंद करण्यात आली होती.

हमीभावाने खरेदी

खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्यामुळे नोंदणी केलेल्या हजारे शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण तयार झाला होता.

हरभरा खरेदी सुरू

मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीमुळे सरकारने अखेर सात जिल्ह्यांमध्ये हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे.

खरेदी प्रक्रिया

त्यामुळे या सात जिल्ह्यांमध्ये हरभरा खरेदी पूर्ववत करण्याची तयारी सुरू झालीआहे. नाफेडद्वारे स्टेट नोडल एजन्सी ही खरेदीची प्रक्रिया राबवत आहेत.

हरभरा खरेदी उद्दिष्ट

राज्यात सर्वांत आधी बुलडाणा जिल्ह्यातील हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याने बंद करण्यात आली.

ॲग्रोवन इम्पॅक्ट

याबाबत ‘ॲग्रोवन’ने वारंवार वस्तुस्थिती मांडत हरभरा खरेदीला वाचा फोडली होती.

या जिल्ह्यांत होणार खरेदी

अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोल, जालना, वाशिम आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांमध्ये हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे.

Litchi Framing | Agrowon