Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा खरंच वाढणार का?

Anil Jadhao 

देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक हरभरा लागवड क्षेत्र दिसतंय. एरवी, राजस्थानमध्ये लागवड अधिक असते. राज्यात २२ लाख ४६ हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली.

यंदा राज्यात परतीचा पाऊस चांगला झाला. तसेच पावसानं उघडीप दिल्यामुळं पेरण्या वेगानं झाल्या. त्यामुळं सध्या हरभरा लागवड जास्त दिसतेय. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १८ लाख हेक्टरवर हरभरा पीक होतं.

महाराष्ट्रासोबतच राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात हरभरा पेरणीचा वेग जास्त दिसतोय. तर मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशात वेग कमी होता.

राजस्थानमध्ये आजपर्यंत २१ लाख हेक्टर, कर्नाटकात ११ लाख ४९ हजार हेक्टर आणि उत्तर प्रदेश ६ लाख हेक्टरवर हरभरा पेरा झाला.

सध्या देशात आणि राज्यात हरभरा पेरणीचा वेग जास्त दिसतोय. मात्र लागवडीच्या शेवटी हरभरा क्षेत्र कमी होऊ शकतं, असा अंदाज हरभरा बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

मागील वर्षभर हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. सध्याही हरभरा ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. त्यामुळं शेतकरी यंदा हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज आहे.

cta image