Team Agrowon
मिसळ म्हटलं की मिसळ प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रात कुठली मिसळ जास्त प्रसिध्द यावरही मिसळ खव्वय्यांचे वाद होत असतात.
पण मिसळ कुठलीही असो, मिसळ प्रेमी ती खाण्यासाठी अगदी तुटून पडतात.
नागपूरचे प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात ५००० किलोंची अस्सल पुणेरी मिसळ बनवली आहे.
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात ही ५००० किलोंची मिसळ बनविण्यात आली आहे.
पुण्यातील फुले वाड्यासमोर ही मिसळ तयार करण्यात आली आहे. अशाच प्रकारे १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तही ५००० किलोंची मिसळ बनविण्यात येणार आहे.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून पुणेकर महापुरुषांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करत आहेत.
'समता मिसळ' असं या उपक्रमाला नाव देण्यात आलं आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांना ही मिसळ वाटण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी मिसळ बनविण्यासाठी हातभार लावला.