Corona China: चीन कोरोना; कापूस, सोयाबीनला फायदा

Team Agrowon

चीन येत्या काही महिन्यांत कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे झिरो कोरोना पॉलिसी संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

Corona In China | Reuters News Agency

त्यामुळे चीनमधील अर्थकारणाला गती मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चीनच्या निर्बंधांमुळे इतर देशांवरही मोठा परिणाम झाला असून जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. 

Corona In China | Reuters News Agency

चीनने निर्बंध उठवल्यावर पुरवठा साखळी सुरळीत होण्यासाठी मदत होईल. भारतातील शेतकऱ्यांसाठी या घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पिकांचे भाव वाढण्याची चिन्हे आहेत.  

Corona In China | Reuters News Agency

चीन येत्या काही दिवसांत कोविड-१९ क्वारंटाईन प्रोटोकॉल शिथिल करण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना चाचण्यांचे प्रमाणही कमी केले जाणार आहे.

Corona In China | Reuters News Agency

चीन सरकारने झिरो कोरोना पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने कडक निर्बंध लागू केले होते. त्याची लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.

Corona In China | Reuters News Agency

देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. ती विक्रमी पातळीवर स्थिर आहे. परंतु गेल्या काही दिवसांत अनेक शहरांनी लॉकडाऊन उठवला आहे.

Corona In China | Reuters News Agency

तसेच विषाणूची रोगकारक क्षमता कमी झाल्याचे उप पंतप्रधानांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आल्याचे बोलले जात आहे.

Corona In China | Reuters News Agency

अर्थात प्रशासकीय यंत्रणेकडून निर्बंध मागे घेण्यासंदर्भात अधिकृत निवेदन करताना त्यात निदर्शनांचा उल्लेख दिसत नाही. निदर्शनांमुळे कोरोना निर्बंध मागे घेतले, हे सरकारला अधिकृतरित्या मान्य करायचे नाही.

Corona In China | Reuters News Agency

परंतु चीनमध्ये कोरोना निदर्शनांच्या रूपाने गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच सविनय कायदेभंगाची घटना घडली आहे. आंदोलनाचे लोण झपाट्याने पसरत गेले.

Corona In China | Reuters News Agency

बिजिंगमध्ये मेणबत्त्या मार्च ते ग्वांगझूमध्ये पोलिसांशी हिंसक झटापट असा मोठा पट या आंदोलनाने धारण केला.

Corona In China | Reuters News Agency

चीनमध्ये झिरो कोरोना पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी सकारकडून टोकाचे प्रयत्न केले जात होते. एक जरी पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तरी संबंधित परिसरात कित्येक आठवडे कडक लॉकडाऊन केला जायचा.

Corona In China | Reuters News Agency

त्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना धुमसत होती. त्याचा गेल्या आठवड्यात भडका उडाला. विविध प्रांतांत सरकारच्या निर्बंधांविरोधात लोकांनी रस्त्यावर येऊन उग्र निदर्शने सुरू केली. 

Corona In China | Reuters News Agency
cta image | Agrowon