Cold wave : थंडी हळूहळू वाढणार

Anil Jadhao 

राज्याच्या तापमानाचा वाढ झाली असतानाच, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राजस्थानामधील चूरू येथे शुक्रवारी देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत निचांकी १.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उद्यापासून राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पारा घसरण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी १६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २५ अंशांच्या दरम्यान होते. सोलापूरात देशातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

पूर्व-मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील वादळी प्रणालीकिनाऱ्यापासून दूर जात आहे. आज सायंकाळपर्यंत या प्रणालीची तीव्रता ओसरणार आहे.

आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image