Jal Jeevan Mission : ‘जलजीवन मिशन’ची कामे वेळेत पूर्ण करा

टीम ॲग्रोवन

ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

Rajesh Deshmukh | Agrowon

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी गुरुवारी (ता. १३) ते बोलत होते. 

Jal Jeevan | Agrowon

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, की प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. 

Water River | Agrowon

कामाच्या प्रगतीबाबत आठवडानिहाय बैठकीचे आयोजन करावे. प्रलंबित शासकीय जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावे. 

Water Taps | Agrowon

कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.

Water Taps | Agrowon

हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने योजना पूर्ण करून हे गाव जल जीवन मिशनच्या आराखड्यातून वगळण्यात यावे. जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेसाठी प्रलंबित १३७ गावांतील जागेबाबत गावपातळीवर बैठक आयोजित करून प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

Water Taps | Agrowon

सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या मध्ये सामंजस्य कराराप्रमाणे कंत्राटदारांना मुद्रा कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. 

Bank Of MaharaSHTRA | Agrowon

 जिल्ह्यात ‘हर घर जल’ अंतर्गत एकूण ३८ गावे घोषित करण्यात आलेली आहेत. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Water Taps | Agrowon
cta image | Agrowon