Cotton Market : कापसाला काय मिळतोय दर?

Anil Jadhao 

चालू आठवड्याची सुरुवात म्हणजेच सोमवारी कापसाचे एमसीएक्सवरील वायदे ३० हजार ६५८ रुपये प्रतिगाठीवर खुले झाले. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. क्विंलटमध्ये हा दर १८ हजार रुपये होतो.

पण सोमवारीच वायदे तुटण्यास सुरुवात झाली. एकाच दिवसात वायदे २९ हजार ६१६ रुपयांवर आले. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर दर १७ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरले होते. म्हणजेच एकाच दिवसात कापसाचे वायदे ६०० रुपयाने कमी झाले होते.

मंगळवारीही वायद्यांमध्ये चढ उतार राहीले. मात्र बुधवारी पुन्हा वाढ होऊन वायद्यांनी ३० हजार ६५२ रुपये, म्हणजेच सोमवारची दरपातळी गाठली. पण बाजार या दरावर टिकला नाही. बुधवारपासून दरात पुन्हा घट होत गेली.

गुरुवारीही कापूस वायदे कमी होत गेले. अखेर शुक्रवारी २९ हजार ९० रुपयांवर म्हणजेच १७ हजार १११ रुपये प्रतिक्विंटलवर बाजार बंद झाला. आठवड्याचा विचार करता वायद्यांमध्ये दर १ हजार ५६८ रुपयांनी नरमले.

चालू आठवड्यात बाजार समित्यांमध्येही कापूस दरात नरमाई पाहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातील म्हणजेच सोमवारी देशातील कापसाला सरासरी ८ हजार ते ९ हजार २०० रुपये दर मिळत होता.

मात्र आठवडाभर दरात काहीसे चढ उतार होत शनिवारी बाजार समित्यांमध्ये कापसाला ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. म्हणजेच या आठवड्यात कापसाच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची घट झाली.

cta image