Cotton Rate : कापूस दर आवाक्यात, तरीही उद्योगांकडून उठाव का नाही?

Team Agrowon

देशातील अनेक बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झालाय.

महाग सुतापासून तयार केलेल्या कपड्यांचा साठा कापड उद्योगाकडे आहे; मात्र सध्या कापडाला मागणी कमी असल्याने हा साठा तसाच पडून आहे.

सध्या सूतगिरण्या आणि कापड उद्योगाकडे जुन्या मालाचा साठा मोठा आहे. महाग कापसापासून तयार केलेल्या सुताचा साठा सूतगिरण्यांकडे आहे.

कापसाचे हे दर सूतगिरण्या आणि कापड उद्योगाच्या पथ्यावर पडायला पाहिजे होते; मात्र असे असतानाही कापड उद्योगाकडून कापसाला मागणी वाढलेली दिसत नाही.

जून महिन्यात कापसाचे दर तेजीत असतानाही उद्योगाने सूत आणि कापडनिर्मिती केली; मात्र आता दर नरमले असतानाही उद्योगांनी उत्पादन कमी केलेले दिसतेय.

मागील पाच ते सहा महिने देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची टंचाई (Cotton shortage) निर्माण होऊन दर तेजीत आले होते; मात्र या वाढलेल्या दरातही सूतगिरण्या आणि कापड उद्योगाने उत्पादन सुरू ठेवले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काहीसे नरमलेत; मात्र असे असतानाही कापड उद्योगांकडून कापसाचा वापर मात्र मर्यादित होतोय.

cta image