पुढील हंगामामध्ये कापसाचे दर घटणार ?

team Agrowon

चालू हंगामात कापसाला चांगला दर (Cotton Rate) मिळाल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडी वाढवली. तर चीनसारख्या देशातील सरकारने शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी (Cotton Sowing) प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुढील काही महिन्यांत कापसाचे दर नरमण्याची शक्यता आहे.

यंदा कापसाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे सध्या सूतगिरण्यांकडून मागणी घटली. सुताला मागणी नसल्याने किलोमागे ३० ते ४० रुपयांनी दर नरमले. परंतु सुताचा साठा मर्यादित आहे. यामुळे सुताच्या दरातील नरमाई थांबेल, असाही दावा केला जात आहे.

तर दुसरीकडे जागतिक पातळीवर उद्योगांकडे कापसाचा साठा असल्याचा दावा केला जात आहे. तर सध्या मागणी कमी होत असून, कापसाच्या दरात नरमाई दिसत असल्याचे उद्योगाने सांगितले.

भारत, अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझील या देशांत लागवड वाढीची शक्यता आहे. कापसाची वाढलेली लागवड आणि पूरक हवामान यामुळे उत्पादन वाढेल. याचा परिणाम कापूस दरावर जाणवेल.

यातील काही देशांतील कापूस ऑगस्ट महिन्यात बाजारात येईल. मात्र दुसरीकडे जागतिक पातळीवर जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटात आहे. त्यामुळे उद्योगांकडून मागणी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत कापूस सध्याच्या दरपातळीवरून कमी होईल, असा दावा या संस्थेने व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.