Cotton Bajarbhav : कापूस उत्पादकांनो धीर धरा

Anil Jadhao 

युएसडीएनं नोव्हेंबरमध्ये जागतिक उत्पादन ९०९ लाख गाठी होईल, असा अंदाज दिला होता. पण आता त्यात कपात करून ९०४ लाख गाठींवर आणला. मात्र दुसरीकडं कापसाचा वापरही ८९८ लाख गाठींवरून ८७२ लाख गाठींपर्यंत कमी केला.

जगातील महत्वाच्या देशांचा कापूस वापर कमी राहील, असं युएसडीएनं म्हटलंय. त्यात चीन, भारत, पाकिस्तान, अमेरिकेचा समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सव्वा टक्क्याने नरमले. आज ८० सेंट प्रतिपाऊंडने कापसाचे वायदे पार पडले. देशातही कापसाच्या वायद्यांमध्ये गाठीमागे २२० रुपयांची घट झाली. 

आज देशातील कापूस वायदे ३१ हजार ५०० रुपयांवर बंद झाले. बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजा ५०० रुपये दर मिळाला.

एरव्ही डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात कापसाची आवक जास्त असते. यंदा कापूस आवक गेल्यावर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी आहे.  पण त्यामुळे उद्योगाचं पोट दुखतंय. कापसाचे दर पाडून आवक वाढविण्यासाठी उद्योगाची धपड सुरु असल्याचं जाणकार सांगतात.

चालू महिन्यात दरात चढ उतार राहतील. मात्र पुढील महिन्यापासून कापूस दर सुधारु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर न सोडता गरजेपुरता कापूस सध्या विकावा, असेही जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image