Cotton Market Rates: कापूस, सोयाबीन, तूर, मक्यासह महत्वाच्या शेतीमालाचे रेट

Anil Jadhao 

देशातील बाजारात कापसाला आज ८५०० ते ९००० रुपये सरासरी दर मिळाला. तर राज्यातील बाजारातही सरासरी दर यादरम्यानच होते.

राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक कमी होती. तर सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये सरासरी दर मिळाला.

राज्यात आज तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये सरासरी दर मिळाला. तर बाजारातील तूर आवक मर्यादीत होती.

हरभरा भाव आजही दबावात होते. आज राज्यातील बााजरात हरभऱ्याला सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

मक्याला राज्यातील बाजारात आज सरासरी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपये दर मिळाला.

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत. आज हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.