Crop Advice: अशी घ्या पिकांची काळजी!

Team Agrowon

सध्याच्या हवामानात पिकांची काळजी (Crop Protection) कशी घ्यावी यांचा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Nail Marathwada Agriculture University) ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिला आहे.

पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय खरीप पिकांची पेरणी करू नये. सोयाबीन पिकाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाला हेक्टरी ३० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ३० किलो पालाश + २० किलो गंधक खताची मात्रा पेरणीच्यावेळी देणे आवश्यक आहे.

खरीप ज्वारी पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. खरीप ज्वारीला ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रेची शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे.

बाजरी पिकास हलक्या जमिनीत ४०:२०:२० व मध्यम ते भारी जमिनीत ६०:३०:३० पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. बाजरी पिकाची पेरणी २० जुलैपर्यंत करता येते. ऊस पिकात तणांचे नियंत्रण करावे.

हळदीमध्ये आंतरपिके घेताना पहिल्या चार महिन्यापर्यंत वाढ होतील अशीच पिके निवडावीत. त्यामध्ये मिरची, घेवडा, कोथिंबीर इत्यादी पिकांचा समावेश करता येईल. हळदीमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते.

पाऊस झालेल्या ठिकाणी नवीन डाळींब आणि चिकू बागेची लागवड करता येईल. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी.

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला आणि फुलपिकांची काढणी करून घ्यावी. मका या चारापिकासाठी ८०:४०:४० नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.