Crop Damage : अवकाळी पावसाचा पिकांवर बसतोय फटका

Team Agrowon

खानदेशात शनिवारी (ता.४), रविवारी (ता.५) अनेक भागात सुसाट वारा, वादळासह पाऊस झाला.

Crop Damage | Agrowon

यात मका, गहू, कांदा, ज्वारी आदी पिके आडवी होवून मोठी हानी झाली आहे.

Crop Damage | Agrowon

शिंदखेडा तालुक्यातील भडणे, हतनूर व तावखेडा, तसेच धुळे तालुक्यातील धनूर, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद व कापडणे परिसरात वादळी वाऱ्या‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Crop Damage | Agrowon

भडणे व तावखेडा परिसरात अधिक, तर कापडणे परिसरात काही अंशी रब्बीचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.

Crop Damage | Agrowon

शनिवारी (ता. ४) रात्री दहाच्या सुमारास भडणे व हतनूर तसेच तावखेडा परिसरात वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपले.

Crop Damage | Agrowon

गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका, टरबूज, दादर या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला हरभरा, गहू व ज्वारीचे मोठे नुकसान होणार आहे.

Crop Damage | Agrowon
Wedding | Agrowon