Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना मिळणार मदत; सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित

Team Agrowon

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घेण्यात निर्णय बुधवारी (ता.५) राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Rain | Agrowon

पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Rain | Agrowon

१५ जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मि.मी पाऊस पडला.

Rain | Agrowon

तसेच त्याच महसूल मंडळात मागील १० वर्षाच्या (दुष्काळी वर्ष वगळून) सरासरी पर्जन्यामानच्या तुलनेत ५० टक्के (दीडपट) किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, सततच्या पाऊस म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Rain | Agrowon

ततच्या पावसाची सध्या कोणतीही परिभाषा नव्हती. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य निकष ठरण्यासाठी कृषी विभागाने समिती नियुक्ती करावी असा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत झाला होता.

Rain | Agrowon

त्यानुसार कृषि व पदुम विभागाच्या २१ डिसेंबर २०२२ च्या शासन आदेशाद्वारे अपर मुख्य सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.

Rain | Agrowon
Indrajeet Bhalerao | Agrowon