Weather : मनडूस चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार

Team Agrowon

बंगालचा उपसागरात (Bay Of Bengal) गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळाची (Mandous Cyclone) निर्मिती झाली आहे.

Agrowon

वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही वादळी प्रणाली आज (ता. ९) मध्य रात्रीपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी ते श्रीहरीकोट्टा दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे.

Agrowon

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

Agrowon

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ‘मनडूस’ चक्रीवादळ तयार झाले आहे.

Agrowon

गुरुवारी (ता. ८) दुपारी ही प्रणाली कारईकलपासून आग्नेयेकडे ४६० किलोमीटर, तर चेन्नईपासून ५५० किलोमीटर आग्नेयेकडे होती.

Agrowon

समुद्रात ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या वादळाचे केंद्र ताशी ११ किमी वेगाने वायव्य दिशेकडे सरकत होते.

Agrowon

चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह, श्रीलंकेत ढगांची दाटी झाली आहे.

Agrowon
cta image | Agrowon