Sugar Production : महाराष्ट्रातील साखर उत्पादन घटीचा देशाला फटका

Team Agrowon

साखर हंगाम

यंदा महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यातील साखर उत्पादन घटल्यामुळे याचा फटका देशाच्या एकूण उत्पादनाला बसला आहे.

Sugar Production | Agrowon

भारतातील साखर उत्पादन

देशात १५ एप्रिलअखेर ३११ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ३२८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

Sugar Production | Agrowon

महाराष्ट्र साखर उत्पादन

महाराष्ट्रात गेल्या हंगामात याच कालावधीत १२६ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या तुलनेत यंदा १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.

Sugar Production | Agrowon

साखर उत्पादनात घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २० लाख टनांनी साखर उत्पादन कमी झाले आहे. जवळपास इतकाच फरक देशाच्या साखर उत्पादनावरही झाला आहे.

Sugar Production | Agrowon

उत्तर प्रदेश साखर उत्पादन

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तर प्रदेशात साखर उत्पादन २ लाख टनांनी वाढून ९६ लाख टन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत उ. प्रदेशात ९४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

Sugar Production | Agrowon

कर्नाटक साखर उत्पादन

कर्नाटकात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ लाख टनाने साखर उत्पादन घटले. या कालावधीत कर्नाटकात गेल्या वर्षी ५८ लाख, तर साखर तयार झाली होती. यंदा ती ५५ लाख टनावर आली आहे.

Sugar Production | Agrowon

साखर हंगाम

गेल्या वर्षी देशात उत्पादनात आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने यंदा सर्वप्रथम आपला पूर्ण हंगाम संपवला आहे. महाराष्ट्राचे साखर उत्पादन थांबल्याने आता उत्तर प्रदेशातून होणारे साखर उत्पादनच देशातील साखर उत्पादनामुळे काही प्रमाणात भर पडणार आहे.

Sugar Production | Agrowon
Cactus Garden | Dr. Vyankatrao Ghorpade