Team Agrowon
रोग प्रसार एम्ब्रीओमार्फत पिलांमध्ये होतो. यामध्ये सालमोनेल्लोसीस, मायकोप्लाझमोसीस, इन्फेक्शियस ब्रॉंकायटीस, फाउल टायफॉइड, रानीखेत आजारांचा समावेश होतो.
प्रसार टाळण्यासाठी हॅचरीजमध्ये योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
अंडी व कोंबडी विष्ठा, मूत्र यांचा अंड्यांच्या कवचाबरोबर संपर्क येतो. यामुळे अशा अंड्यांना गादी साहित्य, श्वसननलिकेतील स्राव, उपकरणे इत्यादींमार्फत संसर्ग होऊन प्रसार होतो.
कोंबड्यांना श्वसनाचे आजार झाले असल्यास त्यांचे श्वसनमार्गातील कण, स्राव, जंतू हवेत सोडले जातात.
आजारी कोंबड्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या कामगाराला हातमोजे, बूट यांचा वापर करणं बंधनकारक करावं.
मायकोप्लाझमोसीस, रानीखेत या सारख्या आजारांचा हवेमार्फत रोगप्रसार टाळण्यासाठीही आजारी कोंबड्यांना वेगळं ठेवून व्यवस्थापन आणि उपचार करावेत.