Rice Variety: 'नजर भात' माहीत आहे का ?

अमित गद्रे

आज सहयाद्रीच्या रांगात फिरताना एका शेतकऱ्याच्या शेतात लागवड केलेला काळ्या पानांचा नजर भात दिसला.

Najar Rice | Amit Gadre

या शेतकऱ्याने भाताची पुरातन नजर भात ही देशी जात अजून जपून ठेवली आहे.

Najar Rice | Amit Gadre

भात शेतीला नजर लागू नये, ही परंपरागत संकल्पना आणि दुर्मिळ जात टिकून राहावी हा मुख्य उद्देश. नजर भात दिसताना काळ्या रंगाचा असून त्याची तूस देखील काळी असते पण आतील दाना पांढऱ्या रंगाचे असतात.

Najar Rice | Amit Gadre

या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त प्रमाणात असलेला लोह. सर्वसाधारणपणे भातामध्ये 3-6 mg लोह प्रती 100 ग्राम पण काळ भातमध्ये 10-12 mg असते.स्थानिक बाजारामध्ये 60 ते 80 रुपये प्रति किलो विकला जातो. अकोले तालुक्यामधील ठाकर आणि महादेव कोळी याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. 

Najar Rice | Amit Gadre

गेल्या काही वर्षात सह्याद्री फोडण्याचे काम सुरू आहे, या सह्याद्रीला नजर लागू नये, ही जैवविविधता अनादी काळ टिकून राहावी, हेच नजर भाताकडे आमचं मागणं आहे.

Najar Rice | Amit Gadre
cta image | Agrowon