Cotton Rate : पांढऱ्या सोन्याला किती मिळतोय दर तुम्हाला माहितेय का?

Team Agrowon

फुलंब्रीच्या आठवडी बाजारात चक्क साडेसहा हजार रुपयांनी कापसाचे खरेदी व्यापारी करताना दिसून आले आहेत.

Cotton Rate | Agrowon

विशेष म्हणजे भाव वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता.

Cotton Rate | Agrowon

मात्र, भाव वाढ न होत दिवसेंदिवस भाव कमी होत असल्याने नाइलाजाने बळिराजाला कापूस विकावा लागत आहे.

Cotton Rate | Agrowon

सुरुवातीला कापसाने नऊ हजाराचा पल्ला पार केला होता.

Cotton Rate | Agrowon

आता मात्र, दररोज कापसाच्या दरात घसरण सुरू असल्याने केवळ साडेसहा हजारांवर कापसाचे दर आलेत.

Cotton Rate | Agrowon

शासनाने कापसाला स्थिर हमीभाव उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

Cotton Rate | Agrowon

फुलंब्री तालुक्यात यावर्षी सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.

Cotton Rate | Agrowon

कापसाचे भाव स्थिर नसल्याने कापूस विकावा की घरात ठेवावा या चिंतेने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

Cotton Rate | Agrowon
Onion Rate | Agrowon