Weather Update : राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे का ?

Team Agrowon

राज्याच्या बऱ्याच भागात सध्या ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन काढणी (Cotton Soybean Harvesting) आणि रब्बी पेरणीच्या (Rabi Sowing) कामात असलेल्या शेतकरी धास्तावले आहेत.

Weather Update | Agrowon

पण सध्या ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता (Rain Forecast) नाही, असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikraon Khule) यांनी सांगितलं.

Weather Update | Agrowon

राज्याच्या अनेक भागात सध्या कमाल तापमानात काहीशी वाढ झालेली आहे. तर मराठवाडा, विदर्भ, आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतंय.

Weather Update | Agrowon

सध्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचं सोयाबीन खळ्यावर आहे.

Weather Update | Agrowon

महाराष्ट्रात सध्या पाऊस पडण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रणाली नाही. त्यामुळं ढगाळ हवामान असलं तरी पावसाची शक्यता मुळीच नाही.

Weather Update | Agrowon

त्यामुळं शेतकऱ्यांनी बिनधास्त असावं. आपली खरिपातील पिकांची काढणी पूर्ण करावी, असं आवाहन खुळे यांनी केलं.

Weather Update | Agrowon
cta image | Agrowon