Kesar Mango : यंदा केसर आंब्याचा गोडवा लवकरच

Team Agrowon

ग्राहकांचा लाडका केसर आंबा यंदा लवकर येण्याचे संकेत खरे ठरताना दिसत आहेत.

Kesar Mango | Agrowon

तुळजापूर, पंढरपूर व सांगोला भागांतील काही बागांमधील आंबा मार्चअखेर किंवा फारतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढायला येतो आहे.

Kesar Mango | Agrowon

काही बाबींसाठी अनुकूल व काही बाबींसाठी प्रतिकूल असणाऱ्या सध्याच्या वातावरणात व्यवस्थापनात खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही आंबा तज्ज्ञांचे म्हणणे आहे

Kesar Mango | Agrowon

महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या माहितीनुसार, कोकणा व्यतिरिक्त इतर महाराष्ट्रामध्ये ४५ हजार हेक्‍टरवर आंबा लागवड आहे.

Kesar Mango | Agrowon

त्यापैकी साधारणतः १० ते १५ हजार हेक्टर आंबा बागा उत्पादनक्षम असाव्यात. त्यातील काही बागा २० ते २५ वर्षे जुन्या आहेत. तर नवीन ८ ते १० वर्षांतील बहुतेक बागा अतिघन लागवड पद्धतीने लागवड केल्या आहेत.

Kesar Mango | Agrowon

कोकण वगळता, मराठवाड्यासह राज्यातील केसर आंबा बागा साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहरतात. यंदा आंबा बागांना मोहर लागणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सुरू राहिले.

Kesar Mango | Agrowon
Agrowon