Team Agrowon
टोमॅटो अत्यंत नाशवंत असून, लगेच खराब होतात. टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येते.
साठवणुकी संदर्भातील अज्ञान, प्रक्रियेविषयी अनभिज्ञता, पुरेशा साधनसामग्रीचा आभाव, तांत्रिक ज्ञानाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे प्रक्रिया करण्याला महत्त्व दिले जात नाही.
टोमॅटोपासून रस, केचप, सॉस असे पदार्थ तर तयार करता येतात. टोमॅटो सॉस, केचप तर शहरी भागात लोकप्रिय असून लोणचे, ज्यूस, सूप, पावडर या पदार्थांनाही बाजारात चांगली मागणी आहे.
टोमॅटो पावडर विविध भाज्यांच्या ग्रेव्ही मध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे.
हॉटेल व्यावसायीकांकडून तसेच विविध प्रक्रिया उद्योगामध्ये टोमॅटो पावडरला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
टोमॅटो पावडर प्रमाणेच टोमॅटो केचपलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.