खाद्यतेल महागाईचा चढता आलेख

Anil Jadhao 

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे सुर्यफुल तेलाचा पुरवठा ठप्प झाला. तर इंडोनेशियाने कच्च्या पामतेलावर निर्यातबंदी लादली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची टंचाई जाणवत आहे.सोयाबीन तेलाचे दर २६ एप्रिल २०२१ ला १४० रुपये प्रतिलिटर होते. ते मागील महिन्यात १६१ रुपयांवर होते, तर २६ एप्रिल २०२२ ला १६६ रुपयांवर पोचले. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयाबीन तेल लिटरमागे २६ रुपयांनी महागले.

Agrowon

सोयाबीन तेलाचे दर २६ एप्रिल २०२१ ला १४० रुपये प्रतिलिटर होते. ते मागील महिन्यात १६१ रुपयांवर होते, तर २६ एप्रिल २०२२ ला १६६ रुपयांवर पोचले. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयाबीन तेल लिटरमागे २६ रुपयांनी महागले.

Agrowon

सूर्यफुल तेलाचे किरकोळ विक्री दर सध्या १८९ रुपये आहेत. ते २६ मार्चला १८२ रुपये होते, तर २६ एप्रिल २०२१ रोजी १६२ रुपयांवर होते. सुर्यफुल तेलाच्या दरात वर्षभरात २७ रुपयांची वाढ झाली.

Agrowon

मोहरी तेलाचेही दर २३ रुपयांनी वाढले. गेल्यावर्षी मोहरी तेल १६१ रुपये प्रतिलिटरने मिळत होते. ते २६ मार्च २०२२ ला १८८ रुपयांवर पोचले. मात्र सध्या मोहरीचा हंगाम सुरु असल्याने दर काहीसे नरमले. मात्र तरीही दर १८४ रुपयांवर टिकून आहेत.

Agrowon

शेंगदाणा तेलाचे दर सध्या १८६ रुपये प्रतिलिटर आहेत. ते गेल्यामहिन्यात म्हणजेच २६ मार्चला १८२ रुपये होते. तर २६ एप्रिल २०२१ रोजी १७१ रुपयाने शेंगदाणा तेलाची किरकोळ विक्री होत होती.

Agrowon

पामतेलाच्या दरातही एका वर्षात २६ रुपयांनी वाढ झाली. गेल्यावर्षी २६ एप्रिलला पामतेल प्रतिलिटर १२९ रुपयाने विकले जात होते. मात्र सध्या हा दर १५५ रुपयांवर पोचला. तर २६ मार्च २०२२ ला पामतेलाची १५१ रुपयांनी किरकोळ विक्री सुरु होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon