Grape : अतिथंडीचे द्राक्ष बागेवरील दुष्परिणाम

Team Agrowon

द्राक्ष हे पीक थंड हवामानाच्या (Cold Weather) प्रदेशातील असून, तिथे उन्हाळ्यात फळे येतात. आपण उष्ण कटिबंधामध्ये असून आपल्या येथील हिवाळा थंड हवामानाच्या प्रदेशातील उन्हाळ्याप्रमाणे असतो

grape | Agrowon

म्हणून आपण द्राक्षाचे पीक (Grape Crop) हिवाळ्यात घेतो. महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे जिल्हा प्रामुख्याने द्राक्ष लागवडीचा (Grape Cultivation) विभाग मानला जातो.

grape | Agrowon

द्राक्षांच्या वाढीसाठी साधारणपणे १५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते.

grape | Agrowon

मात्र गेल्या काही काळामध्ये हवामान बदलाच्या परिणामस्वरूप अतिउष्णता आणि थंडीच्या लाटा दिसून येतात.

grape | Agrowon

त्यांचा विपरीत परिणाम द्राक्ष बागेवर पडतो. तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास द्राक्ष वाढीवर परिणाम होतो.

grape | Agrowon

थंडीच्या लाटा म्हणजेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी जाते व दुपारचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.

grape | Agrowon

जास्त आर्द्रता असताना थंडीची लाट आल्यास सकाळी बराच वेळ धुके राहते.

grape | Agrowon
Nature | Agrowon