Vasu Baras : ग्रामीण भागात वसुबारसेचा उत्साह

टीम ॲग्रोवन

कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी यंदा सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. यावर्षी दिवाळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाहीत.

Diwali | Agrowon

दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा पहिला दिवसच सुरू होतो तो म्हणजे वसुबारसपासून.

Amit Gadre | Agrowon

दिवाळ सणामध्ये वसुबारसचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

Vasu Baras | Agrowon

शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही वसुबारसेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कामानिमित्त शहरात राहणारे लोक दिवाळ सणासाठी आवर्जून आपल्या गावाकडे जात असतात.

Amit Gadre | Agrowon

गावाकडे दिवाळी अगदी पारंपारिक पध्दतीने साजरी केली जाते. लहान थोरांसह सर्वजण दिवाळीच्या तयारीत मग्न असतात.

Amit Gadre | Agrowon

यंदा ग्रामीण भागातही वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Amit Gadre | Agrowon

लहान मुली घरासमोर रांगोळी काढण्यात दंग आहेत. तर घरातील कर्तेधर्ते लोक घराच्या सजावटीमध्ये व्यस्त दिसतात.

Amit Gadre | Agrowon

दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे.

Amit Gadre | Agrowon
cta image