धान्यापासूनचे इथेनॉल होणार महाग

Devendra Shirurkar

धान्यापासूनची इथेनॉल निर्मिती महागणार असल्याची चिन्हे आहेत. तेल विपणन कंपन्या धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या आसवनी प्रकल्पाकडून हे इथेनॉल खरेदी करत असतात. मात्र आता या कंपन्यांना हे इथेनॉल प्रति लिटर २ ते ४ रुपयांनी महाग मिळण्याची शक्यता आहे.

Ethanol Production | Agrowon

धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या आसवनी प्रकल्पांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे त्या इथेनॉलच्या किमतीत सरकारकडून वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारनेच त्यासाठी संमती दिली असल्याचे समजते.

Ethanol from Maize | Agrowon

सध्या तेल विपणन कंपन्या खराब धान्यापासून (तांदूळ) अथवा मक्यापासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलची ५२.९२ रुपये प्रति लिटर दराने खरेदी करतात.

Ethanol from rice | Agrowon

सध्या त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने इथेनॉल निर्मिती करणाऱ्यांनी विक्रीचा दर वाढवण्याचा आग्रह सरकारकडे धरला आहे.या दरवाढीच्या निर्णयामुळे सरकारच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या अभियानात अडसर निर्माण होणार नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Ethanol Production | Agrowon

गेल्या आठवड्यात यासंदर्भात कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखालील समितीची एक बैठक पार पाडली. या बैठकीत समितीने दरवाढीची मागणी तत्वतः मान्य केली असून याबाबतचा अंतिम निर्णय तेल विपणन कंपन्यांवर सोपवला आहे.

Ethanol from Maize | Agrowon

इथेनॉल मिश्रणाचे वाढते उद्दिष्ट लक्षात घेऊन कंपन्यांनी दरावाढीबाबतचा निर्णय घ्यावा, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

Ethanol Production | Agrowon

इथेनॉल निर्मितीसाठी धान्याचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेत केंद्रीय अन्न मंत्रालयाने धान्यापासून इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना भारतीय अन्न महामंडळाकडील तांदळाच्या राखीव साठा वापरण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दिलेला आहे.

Ethanol Production | Agrowon

इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, धान्याची कमतरता आणि प्रत्यक्ष तेल कंपन्यांकडून मिळणारा अपुरा दर यामुळे धान्यापासून इथेनॉल निर्मिती परवडत नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ethanol Production | Agrowon