Abhay Yojna : ‘अभय’ योजनेला डिसेंबरपर्यंत वाढ

टीम ॲग्रोवन

जव्हार, जि. पालघर : जव्हार तालुक्यातील ग्रामीण तथा आदिवासी भागामध्ये रोजगाराची कमतरता आणि कौशल्यपूर्ण  शिक्षणाच्या अभावामुळे येथे नेहमीच आर्थिक अडचणी असतात. 

Power Grid | Agrowon

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येथील आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. या योजनांपैकीच एक योजना ही विलासराव देशमुख अभय योजना महावितरणने सुरू केली आहे.

Tribal Area | Agrowon

या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जव्हार तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालेल्या सहा हजार ग्राहकांना अभय योजनेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढल्याने दिलासा मिळत आहे.

Power Grid | Agrowon

या योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे.

Power Grid | Agrowon

योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते.

Power Grid | Agrowon

या योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी (एक मार्च २०२२ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत) होता.

Power Grid | Agrowon

ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे.

Power Grid | Agrowon

योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.

Power DP | Agrowon

लघुदाबाच्या वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल.

Power Grid | Agrowon
cta image | Agrowon