Farmer Crop Damage: आमदार रोहित पवारांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Team Agrowon

राज्यात अशा प्रकारे सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय.

Crop Damage | Agrowon

आणि सरकार मात्र नियमांच्या चाळण्या लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि कांद्याला अनुदान देण्याची केवळ घोषणा करतंय, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

Crop Damage | Agrowon

आतातरी सरकारने पंचनाम्याचे सोपस्कर बाजूला ठेवावेत आणि नजरअंदाजे नुकसान ग्राह्य धरावं.

Crop Damage | Agrowon

आणि कांदा अनुदानासाठी सक्तीची ऑनलाईन पिक पाहणी रद्द करून केवळ कांदा विक्रीच्या पावतीवरून अनुदान दद्यावं, ही विनंती! अन्यथा शेतकऱ्यांबाबत कोरडा कळवळा दाखवण्याचं तरी सरकारने बंद करावं, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली.

Crop Damage | Agrowon

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळं मतदारसंघातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

Crop Damage | Agrowon

यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

Crop Damage | Agrowon
Banana Processing | Agrowon