Crop Loss : पावसामुळे शेतकरी संकटात, बहुतांश पिकांचं नुकसान

Team Agrowon

मागील दोन दिवसापासून पुणे जिल्हयात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या वातावरणाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

Crop Loss | Agrowon

पुणे जिल्हयात जास्त पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

Crop Loss | Agrowon

काही ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीस सुरूवात झाली होती. मात्र पावसाने हजेरी लावली आहे.

Crop Loss | Agrowon

यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळींब पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

Crop Loss | Agrowon

अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर थंडी यामुळे गहू, कांदा, फळबागा पिकांला फटका बसत आहे.

Crop Loss | Agrowon

वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली आहे.

Crop Loss | Agrowon

पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.

Crop Loss | Agrowon

अद्यापही वातावरणात काही बदल होताना दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Crop Loss | Agrowon
Crop Damage | Agrowon