Team Agrowon
हिंगोली येथे शेतकर्यांना पिकविमा मिळावा यासाठी हजारो शेतकर्यांचा मोर्चा निघाला.
यावेळी स्वखर्चाने उत्स्फुर्तपणे आलेल्या शेतकऱ्यांसह जवळपास २०० वाहनांचा ताफा घेऊन गोरेगाव (ता.शेनगाव) येथून हिंगोलीच्या दिशेने शेतकऱ्यांनी कूच केले.
हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली.
जवळपास ४ तासांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण कार्यालयाचा ताबा घेतला होता.
आंदोलनाची मोठी ताकद येथील प्रशासनाने व HDFC तसेच ICICI Lombard कंपन्यांचे जिल्हा समन्वयकांनी अनुभवली...!
त्यानंतर मागील वर्षीचे HDFC कंपनीकडे हिंगोली जिल्ह्याचे पिकविम्याचे थकित १३ कोटी रुपये १५ दिवसांत चुकते करण्याचे व यावर्षीच्या ICICI Lombard कंपनीबाबत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.