Forest Fire: शिकारीसाठी ठाण्यात डोंगरांना आग

Team Agrowon

वज्रेश्वरी तालुक्यातील ग्रामीण भागात शिकार आणि वन जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी डोंगरांना आग लावण्यात येत आहे.

Forest Fire | Agrowon

गणेशपुरी, उसगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत शेकडो एकर वनसंपदा जळून खाक झाली.

Forest Fire | Agrowon

या आगीच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाला अपयश आले असून नागरिकांमध्ये जागृती केल्यास या घटना कमी होण्यास मदत होईल, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Forest Fire | Agrowon

ठाणे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील जंगले, वनसंपदा जळून कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. भिवंडी तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात नैसर्गिक विविधतेने नटलेले डोंगर, टेकड्या आहेत. त्यामुळे या भागात जंगली प्राण्यांचाही वावर आहे.

Forest Fire | Agrowon

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गणेशपुरी, वज्रेश्वरी, तानसा नदी खोऱ्यातील काही टेकडी गावालगत असल्याने तिथे अतिक्रमण करण्यासाठी प्लांट मिळावा म्हणून येथील भागात आगी लावून जंगल नष्ट करण्यात येते;

Forest Fire | Agrowon

तर अनेकदा सशाची शिकार मिळावी, म्हणून आगी लावण्यात येतात. उसगाव, गणेशपुरी, वज्रेश्वरी, उसगाव बंधारा, पारिवली, कपरीचे पाणी व दुगाड आदी वनक्षेत्रामध्ये उत्खनन, वृक्षतोड, टेकड्या खोदाई, तसेच डोंगरांना आगी लावल्या जात आहेत.

Forest Fire | Agrowon
Forest Fire | Agrowon