Food Inflation : अन्नधान्य, दुधाच्या किंमतींचा भडका उडणार ?

टीम ॲग्रोवन

परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

Wet Dought | Agrowon

पावसामुळे खराब झालेले पीक आणि चढ्या किंमतींचा फटका भारतातील लाखो ग्रामीण गरीबांना बसण्याची शक्यता आहे.

Poor People | Agrowon

अन्नधान्यच नाही तर भाज्या, दूध, कडधान्ये आणि खाद्यतेलाच्या किंमती सुद्धा वाढत आहेत. आणि आगामी काळात हे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

Milk Rate | Agrowon

अर्थतज्ज्ञांच्या मते, सप्टेंबर महिन्यात सरासरी भाववाढ ७.४१ टक्के इतकी होती, ती आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे.

Inflation Rate | Agrowon

मागच्या वर्षी याच महिन्यात निर्देशांकात वाढ झाली होती. पण धान्य, भाजीपाला आणि दूध यांच्या किंमती दबावात राहतील.

Vegetable Inflation | Agrowon

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, सप्टेंबर महिन्यापासून सरासरी भाववाढ कमी व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र भाववाढ कमी करण्यासाठी दीर्घकाळ सातत्य ठेऊन प्रयत्न करायला हवेत.

RBI | Agrowon

महागाई वाढण्यासोबतच अन्नधान्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. मात्र त्या तुलनेत मजुरी वाढलेली नाहीये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Labor | Agrowon