आषाढी वारीसाठी साडे चार हजार गाड्या धावणार

Team Agrowon

आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) एसटी महामंडळाने राज्यभरातून ४ हजार ७०० जादा गाड्या (Additional Bus) सोडण्याचे नियोजन केले आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर यंदा आषाढी वारी होत आहे.

यासाठी राज्यातून ६ ते १४ जुलै दरम्यान जास्तीच्या बस फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. पुणे, कोल्हापूर विभागांतून १२०० जादा गाड्या सोडण्यात येतील.यंदा मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने भाविकांची संख्या वाढेल, अशी स्थिती आहे.

यंदा कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने भाविकांची संख्या वाढेल, अशी स्थिती आहे.

त्यामुळे एसटी महामंडळाने दरवर्षीपेक्षा एक हजार जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

पंढरपूरमध्ये एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी चार ठिकाणी बस स्‍थानक करण्यात येणार आहेत. त्यामध्ये चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय), विठ्ठल कारखाना येथे बस स्‍थानक असतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.