जगभरातील मोहरीचे उत्पादन वाढणार?

Devendra Shirurkar

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मोहरीची भावपातळी वाढल्याने जगभरातील मोहरी उत्पादक देशातील मोहरी लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. २०२१-२०२२ मध्ये जगातील मोहरीचे उत्पादन ७१.३८ दशलक्ष टन होईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने वर्तवला.

Mustard | Agrowon

गेल्या महिन्यात त्यात २ लाख ३ हजार टनांची भर टाकण्यात आली. भारतातील मोहरी उत्पादनातील वाढीच्या शक्यतेमुळे जागतिक उत्पादनाच्या अंदाजात ही सुधारणा करण्यात आली.

Mustard | Agrowon

भारतात ११ दशलक्ष टन मोहरी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला. लागवडीखालील क्षेत्र व वाढत्या उत्पादनाची शक्यता लक्षात घेता अंदाजात गेल्या महिन्याच्या तुलनेत २ लाख टनांची भर घालण्यात आली.

Mustard | Agrowon

२०२१ च्या आर्थिक वर्षात भारताचे मोहरी उत्पादन १०.२१ दशलक्ष टन होते. चालू आर्थिक वर्षात भारताचे मोहरी उत्पादन ११.४६ दशलक्ष टनांवर जाईल, असा उद्योग आणि व्यापारी क्षेत्रातील सूत्रांचा अंदाज आहे.

Mustard | Agrowon

युरोपियन युनियनने ऑस्ट्रेलियातील मोहरी उत्पादनाच्या अंदाजात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या महिन्याच्या सुधारित अंदाजानुसार ऑस्ट्रेलियातील मोहरी उत्पादन ५.४ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे, जे यापूर्वीच्या अंदाजापेक्षा ७ लाख टनांनी अधिक आहे. भावपातळी वाढल्याने ऑस्ट्रेलियातील मोहरी लागवडीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे युएसडीएने जागतिक मोहरी उत्पादनाचा अंदाज वाढवला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mustard | Agrowon