Team Agrowon
या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मानवी शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.
या तांदळाचा ग्लाइसेमिक इंडेक्स ४९ टक्क्यांपेक्षा कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणे म्हणजे या तांदळाचे सेवन केल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते.
प्रजनन तंत्र, संकर आणि निवड पद्धत यासारख्या शास्त्रीय पद्धतींचा वापर या वाण निर्मितीसाठी करण्यात आला.
सर्वाधीक पौष्टिक घटक असलेले तांदळाचे वाण निवडले गेले.
तांदळाचे हे वाण विकसित करण्यासाठी तांदळाच्या हजारो जातींची तपासणी केली गेली.
मधुमेह आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा वाण उपयुक्त आहे. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हा तांदूळ फायदेशीर आहे.