Lumpy Vaccination : शेळ्यांची ‘गोट पॉक्स’ लस ‘लम्पी’वर ठरतेय प्रभावी

Anil Jadhao  & टीम ॲग्रोवन

राज्यभरात लम्पी हा विषाणूजन्य आजार बळावत असल्याने जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Vaccine | Agrowon

त्यानुसार तालुक्यातील ४२,७४१ पैकी २७,८८८ जनावरांचे तालुका पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात आले आहे

Lumpy cow | Agrowon

लम्पीवर विशेष प्रतिबंधात्मक लस अद्यापपर्यंत उपलब्ध नसल्याने शेळ्यांवरील देवी रोगाच्या प्रतिबंधासाठी असलेली गोट पॉक्स ही लस या आजाराला नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येत असून ती अतिशय प्रभावी ठरत आहे, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.

GoatPox Vaccine | Agrowon

लम्पीवर स्वतंत्र लस निर्माण झाली नाही. मात्र, शेळ्यांमध्ये देवी रोगावर वापरण्यात येणारी गोट पॉक्स लस लम्पीवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते आहे.त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाकडून इतर जनावरांनाही ही लस दिली जात आहे.

GoatPox Vaccine | Agrowon

गोट पॉक्स लस दिल्यानंतर २१ ते २८ दिवसांनी पशूंमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होते. असे असले तरी पशुपालकांनी जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन तालुका पशुसंवर्धन विभागाने केले.

Cow | Agrowon

शेतकरी वर्गाला यामुळे दिलासा मिळत आहे

Cow Farm | Agrowon

शेळ्यांमधील देवी रोगाचे विषाणू आणि लम्पी आजारावरील विषाणू जवळपास सारखेच आहेत.

Goat | Agrowon

हे त्यापैकी महत्वाचे प्रभावी कारण आहे.

Goat | Agrowon

शेळ्यांसाठी वापरण्यात येणारी गोट पॉक्स लस ही लम्पीविरोधातही प्रभावी ठरत आहे. - डॉ. जयकुमार सातव, पशुसंवर्धन अधिकारी, वाळवंडा

Healthy Cow | Agrowon
cta image | Agrowon