Gold Rate : सुवर्ण बाजार तेजाळला

टीम ॲग्रोवन

दिवाळी सणाला शहरातील सुवर्ण बाजार लाभदायी ठरला आहे. एकट्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा उच्चांक झाला.

Gold Ornaments | Agrowon

एकाच दिवसात शहरासह जिल्ह्यात ५० किलोपेक्षा अधिक सोन्याची विक्री झाली.

Gold Oraments | *growon

सुमारे २५० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

Gold Ornaments | Agrowon

मोठ्या शोरूममध्ये तर ग्राहक सोने खरेदीसाठी ‘वेटिंग’वर दिसून आले. शोरूमध्ये प्रचंड गर्दी होती.

gold Ornaments | Agrowon

तब्बल दोन वर्षांनंतर धनत्रयोदशीला एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.

Gold Ornaments | Agrowon

दिवाळीत येणाऱ्या धनत्रयोदशीला नवीन सोने खरेदीने वर्षभर सुवर्ण खरेदीचा योग येतो, असे सांगितले जाते.

gold Market | Agrowon

जळगावचा सुवर्ण बाजार राज्यासह इतर भागात प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भातील ग्राहकही जळगावात सोने खरेदीसाठी येतात. सुवर्णरूपी धनाची, पैशांची पूजा केली जाते.

Gold Market | Agrowon

धन्वंतरी जयंती असल्याने धन्वंतरी देवतेची आराधना करून सुदृढ आरोग्याची मनोकामना केली जाते. यामुळे धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Dhanwantari God | Agrowon

सुवर्ण बाजारात सोन्याचे विविध प्रकारचे आकर्षक दागिने, फॅन्सी दागिने, मणी मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी, ब्रेसलेट आदींना मोठी मागणी होती. काहींनी सुवर्ण चीपही खरेदी केल्या.

Gold Ornaments | Agrowon
cta image | Agrowon