ऊस एफआरपीतील वाढ फसवी?

Anil Jadhao 

केंद्र सरकारने उसाच्या ‘एफआरपी’त टनाला १५० रुपयांची वाढ केली. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं म्हटलं जातय.

Sugarcane | Agrowon

एफआरपी वाढवताना रिकव्हरी बेस १० टक्क्यांवरून १०:२५ केला. त्यामुळं एफआरपीतील प्रत्यक्ष वाढ कमीच आहे.

Sugarcane | Agrowon

एफआरपीचा ०.२५ टक्क्याने रिकव्हरी बेस वाढविल्याने प्रत्यक्षात ७६ रुपये एफआरपी वाढ झाली आहे.

Sugarcane | Agrowon

ज्या भागात रिकव्हरी कमी आहे, अशा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसेल. गेल्या हंगामात औरंगाबाद, अमरावती, नागपूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत दहा टक्केच्या आत रिकव्हरी होती.

Sugarcane | Agrowon

दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांनी तोडणी वाहतूक खर्च वाढविला आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

Sugarcane | Agrowon

कमी रिकव्हरी दाखवून कारखाने ऊस उत्पादकांची फसवणूक करू शकतात, असे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

Sugarcane | Agrowon

दुसरीकडे साखर कारखान्यांनी साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane | Agrowon